स्वस्थ राहण्यासाठी स्ट्रॉबेरी असते खूपच भारी --- चला तर मग बनवा ही रेसीपी घरच्या घरी !


स्ट्रॉबेरी विथ होम मेड क्रीम 





स्ट्रॉबेरी चा सिझन आला आणि बाजारात भरपूर स्ट्रॉबेरी दिसायला लागली व स्ट्रॉबेरी खाण्याची इच्छाही खूप होत असेल, पण ह्या कोविड संकटामुळे स्ट्रॉबेरी तुम्हाला खायची भिती वाटते आहे का?

                                                                                                         

मैत्रिणींनो सध्या बाजारात भरपूर स्ट्रॉबेरी दिसायला लागली आहे व आपल्याला स्ट्रॉबेरी खाण्याची इच्छाही होत असेल पण ह्या कोविड संकटामुळे नक्कीच तुम्हाला स्ट्रॉबेरी खाण्याची भीती वाटत असेल कारण ह्या कोविड मुळे आपला घसा सांभाळणे व त्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे,  आणि त्याचे कारण ही तसेच आहे की स्ट्रॉबेरीची चव ही मुळातच आंबट गोड असते आणि बहुतेक वेळा तर स्ट्रॉबेरी  आंबटच निघते पण जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे  स्ट्रॉबेरी खाल्ली तर तुम्हाला ते आंबटही लागणार नाही,त्याची चवही अगदी बदलेल आणि खाताना सुद्धा खूप मज्जा येईल.

पण त्यासाठी हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत वाचने खूप गरजेचे आहे .

नमस्कारमी पल्लवी देशमुखMagical Recipe Expert , 30  मिनीट्स मॅजिकल रेसीपी  या प्लॅटफॉर्म ची निर्माती , येत्या वर्षात 10000 वर्किंग विमेन ला   30 minutes Magical Recipe Champion  बनविण्याचा माझा ध्यास आहे.


 स्ट्राॅबेरी हे फळ लहान-मोठ्या सर्वांनाच खुप प्रिय आहे. या फळात खुप गुणधर्म आणि शरीराकरता मुबलक प्रमाणात पोषकतत्वं देखील समाविष्ट आहेत.

1750 मधे स्ट्राॅबेरी फ्रांस इथं ब्रिटनीत एका जातीच्या रूपात सापडली होती. सुरूवातीला लोक याचे सेवन जास्त करत नव्हते या कारणाने याचे उत्पादन देखील कमी प्रमाणात घेतले जात होते त्यानंतर मात्र व्यावहारीक दृष्टीकोनाला लक्षात घेउन याचे उत्पादन सुरू झाले. आज स्ट्राॅबेरी पेक्षा चांगले काही नाही त्याची चव, स्वाद, आणि रसयुक्त बनावटीने तुम्ही त्याच्या प्रेमात पडता. त्याची चव चाखण्याआधी त्याचे लाल गोंडस रूप बघुनच तुम्ही आकर्षीत व्हाल.

गुलाबी रंगाने व्यापलेले स्ट्राॅबेरी एकमेव असे फळ आहे ज्याचे बी आत नसुन बाहेर असते. त्याचे आकर्षक रूप मनमोहक ठेवणं आणि रसस्वादच त्याला इतर फळांपासुन वेगळे आणि प्रसिध्द बनवते.

या फळाचा जर तुम्हाला संपुर्ण आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला थेट याचे सेवन करावे लागेल किंवा याचा उपयोग तुम्ही आईसक्रीम, जेली, सिरप, चाॅकलेट आदी पदार्थांमधे देखील करू शकता.

स्ट्राॅबेरी ताजी असो किंवा स्टोअर केलेली यात नेहमी आकर्षक स्वास्थ्यलाभदायक गुण असतातच जे निश्चित तुम्हाला अचंबीत करतील.

स्ट्राॅबेरी व्हिटामीन सी आणि के सोबतच फाॅलीक अॅसिड,  मॅग्नेशियम, मॅगनीज, आणि पोटॅशियमचा उत्तम स्त्रोत आहे. एक कप स्ट्राॅबेरीत 49 कॅलरीज असतात यात साखरेचे प्रमाण देखील कमी असते आणि डाइटरी फायबर चा उत्तम स्त्रोत म्हणुन देखील स्ट्राॅबेरीला पाहीलं जातं शिवाय स्ट्राॅबेरीत फायटोन्यूट्रियंट आणि फ्लोवोनाइड चे प्रमाण चांगले आढळते. 
संपुर्ण देशभरात स्ट्राॅबेरीच्या जवळ जवळ 600 पेक्षा जास्त प्रजाती आहेत तसेच सर्वाधिक अॅंटीआॅक्सीडंट असलेल्या फळात याचा समावेश होतो.


Benefits of Strawberries
 Benefits of Strawberries
  • स्वस्थ पाचनक्रिया आणि शरीरातील जमा चरबी कमी करण्याकरता

स्ट्राॅबेरीत फायबर मोठया प्रमाणात आढळतं म्हणुन स्ट्राॅबेरी आपल्या आतडयांना स्वस्थ ठेवते, एंथोसायनिन हे लाल रंगाचे अॅंटीआॅक्सीडंट देखील स्ट्राॅबेरीत सापडतं यामुळे शरीरातील अतिरीक्त चरबी कमी होते या सर्वोत्तम फळात नाईट्रेट देखील आहे जे शरीरात आॅक्सीजनचे प्रमाण वाढवते शरीरातील रक्तप्रवाहाच्या गतीला विकसीत करतं ज्याने शरीराला आलेला स्थुलपणा सहज कमी होतो.

  • हाडांच्या स्वास्थ्याला विकसीत करतं

स्ट्राॅबेरीत पोटॅशियम मॅग्नीशियम आणि व्हिटामीन के सापडतं ज्यामुळे आपल्या शरीरातील हाडांची ताकत वाढते जे आपल्या आरोग्याकरता खुप आवश्यक आहे.

  • कर्करोगापासुन वाचवतो

एका शोधानुसार असे समजते की सहा महिन्यांपर्यंत कोरडया स्ट्राॅबेरी पावडर मधे पाणी मिसळुन पिल्यास कॅंसर चे 80% सेल्स कमी होतात आणि यात एसोफागेल कॅंसर थांबवण्याची क्षमता आहे.

  • फाॅलीक अॅसीडने भरलेले फळ

स्ट्राॅबेरी हे फळ तुमच्या शरीराला फोलेट ने भरतं जे खादयपदार्थांमधे आढळुन येणा-या फाॅलीक अॅसीड चा महत्वपुर्ण भाग आहे. व्हिटामीन B चे प्रमाण शरीरात हवे तेवढे नसेल तर आपल्याला संवहनी रोग, अॅथेरोस्कलेरोसिस आणि पचनतंत्रात गडबड सारखे आजार होवु शकतात.

  • रिंकल एलिमिनेटर

 अॅंटीआॅक्सीडंट एल्लागिक अॅसिड स्ट्राॅबेरीत सापडतं जे आपल्या शरीरातील फायबर ची रक्षा करतं आणि आपल्या त्वचेला तरूण ठेवतं.

  • उच्चरक्तदाबात उपयोगी

रोज स्ट्राॅबेरी सेवन केल्यास केवळ हाइपरटेंशनच नाही तर शरीरातील रक्तप्रवाहाला वाढवुन स्वस्थ आॅक्सीजनचा संचार शरीरात वाढवतं ज्यामुळे उच्चरक्तदाबाला नियंत्रीत केल्या जातं.

स्ट्राॅबेरीत जर इतके सगळे गुण आहेत तर मग वाट कसली बघताय ! आजपासुनच स्ट्राॅबेरी खायला सुरूवात करा आणि निरोगी आणि स्वस्थ जीवन जगा . . . .

Strawberry with Home Made Cream


रेसीपी 




साहित्य 

  • २ प्रकारे कापलेले strawberries 
  • पिठी साखर 
  • मीठ 
  • Whipped क्रीम 
  • Food colours (red, green)
  • Vanila essence



कृती :-

whipped  cream 

Whipped Cream बनविण्यासाठी लागणार आहे ,

दुधाची घट्ट साय                                             १ वाटी 
पिठी साखर                                                   २ टेबलस्पून 

 दुधाची साय एका bowl मध्ये घेऊन त्यामध्ये पिठीसाखर व चिमूटभर मीठ  मिसळून चांगले फेटून घ्यावे. 
    त्या क्रीम चा थीकनेस साधारण आपल्या नेहमीच्या डोसा batter  सारखा झाला पाहिजे, ज्यामध्ये स्ट्रॉबेरी चे तुकडे सहज मिक्स करता येईल . 

टीप :-  बाजारामध्ये अमूल  चे whipped  क्रीम मिळतं, ज्यांच्याकडे साय साठवलेली नसेल ते लोक हा सुद्धा पर्याय वापरू शकता त्याने पण तुमचे काम होईल .  


१. एका bowl  मध्ये whipped  क्रीम घेऊन त्यात vanila essence चे २ थेंब घाला आणि मिक्स करून घ्या. 

२. त्यातले थोडे क्रीम २ वेगवेगळ्या bowl  मध्ये घेऊन त्यातील एका मध्ये थोडा लाल रंग मिक्स करा  व दुसऱ्या मध्ये थोडा हिरवा रंग मिक्स करा. ( रंग म्हणजे food colour only)

३.  आता आपल्याकडे एकूण ३ रंगामध्ये मध्ये whipped cream  आहे.  पांढरा, थोडा गुलाबी आणि हिरवा. 

४.  प्रत्येक रंगाच्या क्रीम मध्ये स्ट्रॉबेरी चे छोटे तुकडे मिक्स करून घ्या. 
 
४. एका transparent  ग्लास मध्ये आपल्या आवडीच्या colour combination प्रमाणे arrange करून घ्या व सगळ्यात वरती स्ट्रॉबेरी चे मोठे काप टाकून त्याला serve करा. 






 ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद!

हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेन्ट करा व तुमच्या ३ मैत्रिणींना  शेअर करा. 




Comments

  1. Kya bat hai आतापर्यंत फक्त स्ट्रॉबेरी खात होतो पण त्यामागचे स्ट्रॉबेरी चे गुणधर्म आणि त्याचे शरीरात होणारे फायदे हे आमच्यासाठी आज खरच खूप आश्चर्यजनक आहे🙏🙏

    ReplyDelete
  2. Mrs Priti Agrey........ khupach tempting recipe aahe, will try tonight for dessert 😀. Really great to know about power packed nutrition strawberry has 👌👌👌👍

    ReplyDelete
  3. Mrs Dhanashree Shinde...Really healthy and delicious dish..

    ReplyDelete

Post a Comment