मैत्रिणींनो उपवासाला तुम्हाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलाय का किंवा साबुदाण्याच्या पदार्थांमुळे तुमच्या पोटाला काही त्रास होतोय का तर आपल्याकडे अशा बऱ्याच वस्तू असतात ज्याचा वापर करून उपवासाचे आपण खूप चविष्ट व पोटाला त्रास न देणारे पौष्टिक असे पदार्थ बनवू शकतो.
नमस्कार, मी पल्लवी देशमुख, “Magical Recipe Expert” , 30 मिनीट्स मॅजिकल रेसीपी या प्लॅटफॉर्म ची निर्माती , येत्या 3 वर्षात 10000 वर्किंग विमेन ला “30 minutes Magical Recipe Champion” बनविण्याचा माझा ध्यास आहे.
मैत्रिणींनो उपवास आला की आपल्याकडे थोडेच पर्याय उपलब्ध आहे, साबुदाणा, शेंगदाणे, भगर या पासून बनवलेले पदार्थ वारंवार खाऊन खाऊन एक तर आपल्या पोटाला त्रास होतो किंवा कंटाळा आला आहे, असे जर तुम्हाला वाटत असेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे.
यामध्ये मी तुमच्यासाठी उपवासाच्या असा एक पदार्थ घेऊन आली आहे की जो तुम्ही याआधी कधी खाल्ला नसेल किंवा युट्युब वर सुद्धा बघितला नसेल आणि आणि तो म्हणजे "उपवासाचे Stuffed उत्तपम" खाण्यासाठी एकदम रुचकर लागेल त्याचबरोबर खूप पौष्टिकही असेल आणि खाल्ल्यानंतर आपलं पोट आणि मन दोन्हीही तृप्त होईल.
ह्याची रेसिपी जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग तुम्हाला शेवटपर्यंत वाचणे गरजेचे आहे.
साहित्य
१. मखाना २ कप
२. भगर १/२ कप
३. पनीर १ कप
४. जिरे पूड १ टीस्पून
५. जिरे १ टीस्पून
६. काळी मिरेपूड १ टीस्पून
६. हिरव्या मिरचीचे बरीक तुकडे १ टेबलस्पून
७. भाजलेल्या दाण्याचा जाडसर कूट २ टेबलस्पून
८. गाईचे तूप/ शेंगदण्याचे तेल १ टेबलस्पून
९. हिरवी/ लाल सुकी मिरची २
१०. उपवासाचे मीठ आवश्यकतेनुसार
कृती

१. सर्वप्रथम मखाना व भगर वेगवेगळ्या bowl मध्ये स्वच्छ धुवून कमीत कामी ४ तास किंवा रात्रभर भिजत घालावा.
२. भिजवलेला मखाना व भगर हिरवी किंवा लाल मिरची व थोडे जिरे, चवीप्रमाणे मीठ घालून मिक्सर् मध्ये बरीक करून घ्यावे, म्हणजे छान smooth paste करावी. Batter ची consistency आपल्या नेहमीच्या डोसा batter प्रमाणे करावी त्यासाठी आधीच जास्ती पानी घालू नये.
३. त्यानंतर एका bowl मध्ये पनीर कुस्करा करून त्यामध्ये जिरे पूड, मीठ, हिरव्या मिरचीचे तुकडे,मिरेपूड, दाण्याचा कूट घालून मिक्स करावे व आपले stuffing तयार करून घ्यावे.
४. एका नॉनस्टिक तव्याला थोडेसे शेंगदाणा तेल किंवा गाईचे तूप लाऊन grease करून घ्यावे.
५. तव्यावर batter ची एक layer पसरवून त्यावर stuffing स्प्रेड करावे व लगेच त्यावर batter ची दुसरी layer पसरवून घ्यावी.
६. दोन्ही बाजूनी उत्तपम छान क्रिस्प होईपर्यंत शेकून घ्यावा . एका बाजूने चांगले खरपूस होईपर्यंत उत्तपम परतऊ नका.
टीप :- ह्या उत्तपम सोबत आपल्याला दुसऱ्या कशाचीही गरज पडणार नाही किंवा आपण इन्स्टंट शेंगदाणा चटणी बनवू शकतो.
ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद!
हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेन्ट करा व तुमच्या ३ मैत्रिणींना शेअर करा.




Mrs Priti Agrey
ReplyDeleteExcellent recipe Pallavi!! I have tried and it was very tasty!!!
Thank you
Deleteखूप छान
ReplyDeleteThank you 🙏🏻
DeleteSuperb recipe pallavi...
ReplyDeleteYour recipes are tempting me to do Upwas😂
ReplyDeleteWow...Yummy Dish.
ReplyDeleteTempting and Superb Recipe
वा जबरदस्त
ReplyDeleteनक्कीच करून बघेन
Thank you 😊
DeleteKhup chan
ReplyDeleteThank you 🙏🏻
DeleteTasty and healthy also मी नक्की करून बघते
ReplyDeleteYes sure. Thank you so much 🙏🏻
DeleteKhoopach chan recipe pahilyanda baghitli and healthy sudha ahe Thank you sooo much 🙏🙏💐💐
ReplyDeleteThank you 🙏🏻
DeleteVery delicious dish..I'll definitely try this..thank you
ReplyDeleteThank you 🙏🏻
Delete