डायट मुळे तुम्हाला दिवाळीचा फराळ बनविण्याचे टेन्शन आले आहे का? किंवा दिवाळीचा फराळ बनविण्यासाठी मैदा व तेलाचा कमीत कमी वापर कसा करावा हा प्रश्न पडलाय का ?
मैत्रिणींनो,आत्ताच दसरा झाला आणि आपल्या सगळ्यांना दिवाळीचे वेध लागले आहे, आता अगदी ७-८ दिवसांवर दिवाळी आली आहे आणि हीच वेळ आहे तुमचे ऑफिस सांभाळून दिवाळीच्या फराळाचे नियोजन करण्याची जर तुम्ही आत्ताच नियोजन करायला घेतले तर नोकरी करून सुद्धा दिवाळीच्या आधीच तुमचा फराळ तयार असेल आणि तुम्हाला फराळ बनविण्याचे टेन्शन नाही येणार नाही.
यावर्षी तर covid-19 मुळेअशी परिस्थिती आहे की आपण फराळाची बाहेरून ऑर्डर मागवणे आपल्या व कुटुंबाच्या
आरोग्यासाठी हानिकारक आहे, म्हणून आपण घरीच काय चांगले व थोडेसे पौष्टिक बनविता येईल याचा विचार करायला हवा.
नमस्कार, मी पल्लवी देशमुख, “Magical Recipe Expert” , 30 मिनीट्स मॅजिकल रेसीपी या प्लॅटफॉर्म ची निर्माती , येत्या 3 वर्षात 10000 वर्किंग विमेन ला “30 minutes Magical Recipe Champion” बनविण्याचा माझा ध्यास आहे.
दिवाळीचा फराळ खाताना आपल्या शरीरामध्ये किती जास्त प्रमाणात मैदा व तेल जात आहे व ते आपल्या आरोग्यासाठी अगदी अयोग्य आहे हे प्रश्न मला नेहमीच यायचे. मग मी, आपण मैदा व तेल यांचा कमीत कमी वापर कसा करता येईल याचा विचार करायला सुरु केले आणि मला असे लक्षात आले की जे पदार्थ आपण मैद्याचा वापर करून बनवू शकतो तेच पदार्थ अगदी गव्हाचे पीठ किंवा रवा वापरून सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने किंवा त्याहीपेक्षा चविष्ट आपल्याला बनवता येतात.
दिवाळीचा फराळ बनविताना तुमच्या पुढे तुमच्या डायट चा प्रश्न आहे का? आणि मैदा व तेलाचा कमीत कमी वापर कसा करावा हा सुद्धा प्रश्न आहे का? जर असे असेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे.
त्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचने खूप गरजेचे आहे.
मैत्रिणींनो, दिवाळी हा हिंदू संस्कृती मधील अतिशय महत्वाचा सण आहे, ह्या सणामध्ये पूजेला व नैवेद्याला अतिशय महत्वाचे स्थान आहे, दिवाळीच्या वेळी आपण जो फराळ बनवतो तो देवाला नैवेद्य म्हणून सुद्धा ठेवतो, म्हणूनच मी फराळ बनविण्याची सुरुवात गोड पदार्थांनी करणार आहे आणि तेच पदार्थ तुमच्यासाठी सुद्धा घेऊन आली आहे.
आपला पहिला पदार्थ आहे
यावर्षी तर covid-19 मुळेअशी परिस्थिती आहे की आपण फराळाची बाहेरून ऑर्डर मागवणे आपल्या व कुटुंबाच्या
आरोग्यासाठी हानिकारक आहे, म्हणून आपण घरीच काय चांगले व थोडेसे पौष्टिक बनविता येईल याचा विचार करायला हवा.
नमस्कार, मी पल्लवी देशमुख, “Magical Recipe Expert” , 30 मिनीट्स मॅजिकल रेसीपी या प्लॅटफॉर्म ची निर्माती , येत्या 3 वर्षात 10000 वर्किंग विमेन ला “30 minutes Magical Recipe Champion” बनविण्याचा माझा ध्यास आहे.
दिवाळीचा फराळ खाताना आपल्या शरीरामध्ये किती जास्त प्रमाणात मैदा व तेल जात आहे व ते आपल्या आरोग्यासाठी अगदी अयोग्य आहे हे प्रश्न मला नेहमीच यायचे. मग मी, आपण मैदा व तेल यांचा कमीत कमी वापर कसा करता येईल याचा विचार करायला सुरु केले आणि मला असे लक्षात आले की जे पदार्थ आपण मैद्याचा वापर करून बनवू शकतो तेच पदार्थ अगदी गव्हाचे पीठ किंवा रवा वापरून सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने किंवा त्याहीपेक्षा चविष्ट आपल्याला बनवता येतात.
दिवाळीचा फराळ बनविताना तुमच्या पुढे तुमच्या डायट चा प्रश्न आहे का? आणि मैदा व तेलाचा कमीत कमी वापर कसा करावा हा सुद्धा प्रश्न आहे का? जर असे असेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे.
१. रव्याचे चिरोटे/खाजा
१. बारीक रवा ३ वाटी
२. तूप १ वाटी
३. साखर २ वाटी
४. मीठ चवीपुरते
५. कॉर्न फ्लोउर ३ चमचे
६. वेलची पूड १ चमचा
७. दूध १ कप
८. बेकिंग पाऊडर १ चमचा
कृती
२. पाकातले चिरोटे बनविण्यासाठी आपल्याला एक तारी पाक लागेल. आपण एक तारी पाक बनवून घ्यावा, पाक बनवण्यासाठी एका पॅनमध्ये एक वाटी साखर घालून त्यामध्ये साधारण साखर बुडेपर्यंत पाणी घालावे कमीत कमी सात ते आठ मिनिटांमध्ये आपला एक तारी पाक तयार होतो पाक तयार झाला गॅस बंद करुन त्यामध्ये एक चमचा वेलची पूड घालावी.
कोरडे चिरोटे बनविण्यासाठी अर्धा वाटी साखर मिक्सरमध्ये बारीक करून पिठीसाखर तयार करावी.
३. आपला रवा आता सेट झाला असेल त्याला परत एकदा मळून घ्या आणि त्याचे चार समान वाटे करून घ्या त्यातील एक गोळा आपल्याला पांढरा ठेवायचा आहे दुसऱ्या गोळ्यांमध्ये खाण्याचा लाल रंग अर्धा चमचा टाका आणि मळून घ्या तिसऱ्या गोळ्यांमध्ये लाल रंग थोडासा कमी घाला जेणेकरून आपल्याला गुलाबी रंगाचा गोळा मिळेल आणि चौथ्या गोळ्या मध्ये थोडासा हिरवा रंग घाला. आपण रवा चार रंगांमध्ये बनवून घेतला आहे पांढरा लाल गुलाबी व हिरवा प्रत्येक रंगाचे दोन दोन छोटे गोळे करून त्याच्या पातळ पोळ्या लाटून घ्याव्या.
४. एका छोट्या बाऊलमध्ये तीन चमचे कॉर्नफ्लोअर आणि त्यामध्ये तीन चमचे तूप घालून स्मूथ पेस्ट तयार करून घ्यावी.
आता आधी आपल्याला पांढरी पोळी घेऊन त्यावर ही पेस्ट सगळीकडे लावून घ्यावी व नंतर परत त्याच्यावर एक पांढरी पोळी
व्यवस्थित ठेवावी जेणेकरून आत मध्ये कुठेही एअर बबल्स राहणार नाही. त्यानंतर आपल्याला हिरवा रंगाची पोळी नंतर
गुलाबी व त्यानंतर लाल रंगाची पोळी अशाच प्रकारे ठेवायचा आहे नंतर त्यावर ती एकदा लाटण्याने लाटून घ्यावे हे सगळं
सेट झाल्यावर त्या लाटलेल्या पोळ्यांचा एक रोल करावा, रोल करताना त्यामध्ये अजिबात एअर राहणार नाही याची
काळजी घ्यायची आहे व रोजच्या शेवटच्या कडा पाण्याने चिटकवून घ्याव्या . एकदा रोल तयार झाला की त्याला हाताने
परत थोडासा लांब करून घ्यायचा आहे आणि मग साधारण एक बोटाच्या अंतराने त्याचे काप करून घ्यायचे, काप तयार
झाले की एका प्लेटमध्ये दहा मिनिटांसाठी,फ्रिजमध्ये सेट व्हायला ठेवायचे जेणेकरून त्यामध्ये वापरलेलं तूप घट्ट होईल
आणि चिरोटे व्यवस्थित तयार होतील.
५. मायक्रोवेव्ह १८० डिग्रीवर दहा मिनिटांसाठी preheat करून घ्यावे.
६. दहा मिनिटानंतर हलक्या हाताने सगळे चिरोटे थोडेसे जाडसर लाटून घ्यावे व नंतर
त्यांना १८० डिग्रीवर दहा ते बारा मिनिटांसाठी बेक करावे.
५. चिरोटे बेक झाले की अर्धे चिरोटे आपण तयार केलेल्या एकतारी पाकामध्ये एक मिनिटसाठी टाकून दोन्ही बाजूनी बुडवून घ्यावे व एका चाळणी मध्ये त्यांना काढून घ्या जेणेकरून त्यातील जास्तीचा पाक निघून जाईल आणि अर्ध्या चिरोटयांवर गरम असतानाच पिठीसाखर व्यवस्थित पसरवून घ्यावी घ्यावी, गरम-गरम चिरोटे थोड्याच वेळात पिठीसाखर absorb करेल.
२. रवा व गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे
साहित्य
१. गव्हाचे पीठ २ वाटी
२. बारीक रवा १ वाटी
३. बटर १/२ वाटी
४. तूप १/2 वाटी
५. साखर १ वाटी
६. दूध १ वाटी
७. बेकिंग पाऊडर २ चमचे
टीप:- बेकिंग साठी लागणारा वेळ हा मायक्रोवेव्ह नुसार बदलू शकतो पण कमीत कमी दहा ते बारा मिनिटं लागणारच,
बेकिंग करताना जर आपण पहिल्यांदा बेक करत असू तर थोड्याथोड्या वेळाने तपासून बघावे आपल्याला चिरोटयांचा रंग
जास्ती बदलू द्यायचा नाही पण शंकरपाळयांचा रंग मात्र थोडा dark असायला पाहिजे.
पुढच्या ब्लॉगमध्ये मी,परत अशाच एका पारंपारिक रेसिपी चे Healthy Version घेऊन येणार आहे तर आपण लवकरच भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये.
ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद!
हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेन्ट करा व तुमच्या ३ मैत्रिणींना शेअर करा.

खूपच छान ताई
ReplyDeleteनक्कीच करून बघेन
Wow! Interesting Recipes . Lovely presentation 👌👌
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteKhup bhari pallavi nakkich karen me
ReplyDelete