अर्ध्या तासाच्या आत जेवण बनविण्याच्या 5 मॅजिकल टिप्स...........


स्वयंपाका साठी वेळ अपुरा पडतो आहे कात्यामुळे तुम्हाला स्वयंपाक बनवायचा  कंटाळा येतो आहे का


मैत्रिणींनोतुमचे घरचे काम आणि ऑफिसचे काम balance  करण्यात तुमची तारेवरची कसरत
होते आहे का

 माझेही असेच व्हायचेएखादा सण आला तर मला सुट्टीच घ्यावी लागायचीआणि मग माझ्या  आजीने व आईने काही महत्वाच्या टिप्स सांगितल्या त्याची मला इतकी मदत झाली कि  मला नोकरी करून स्वयंपाकाचा कधीच कंटाळा आला नाहीत्यामुळे मला उलट स्वयंपाकामध्ये इंटरेस्ट निर्माण होत गेलानवनवीन पदार्थ व त्यामधले  Innovations कसे करायचे  हे सुचत गेले  त्याचबरोबर टाईम मॅनेजमेंट पण शिकले.

तुमचेही जर असेच होत   असेल तर मी तुम्हाला त्याच टिप्स सांगणार आहेत्या जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमच्या मध्ये स्वयंपाकाची गोडी ही निर्माण होईल व तुमचा वेळ ही वाचेल. 

नमस्कारमी पल्लवी देशमुखMagical Recipe Expert , 30  मिनीट्स मॅजिकल रेसीपी  या प्लॅटफॉर्म ची निर्माती , येत्या वर्षात 10000 वर्किंग विमेन ला 30 minutes Magical Recipe Champion  बनविण्याचा माझा ध्यास आहे.

मैत्रिणींनोआपल्याला रोज-रोज ऑफिस सांभाळून सकाळ-संध्याकाळ स्वयंपाक करायचा कंटाळा येतो किंवा आपण यामध्ये इतके   गुंतून जातो की कधी-कधी स्वतःसाठी वेळ सुद्धा मिळत नाही मग आपण त्यासाठी दुसरा पर्याय शोधतो आणि तो म्हणजे Hotels  परंतु आता परिस्थिती वेगळी आहे covid-19 मुळे Hotels  बंद आहे आणि सुरु जरी झाले तरी एक प्रश्न मात्र आहेच की Hotels  आपल्या  व कुटुंबाच्या आरोग्यासाठी कितपत योग्य आहे या काळामध्ये तर आपण घरचेच Nutritious Food खाणे गरजेचे आहे आणि ते लवकरात लवकर कसे बनवावेत यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स.

त्यासाठी तुम्हाला माझा हा ब्लॉग शेवट पर्यंत वाचणे अत्यंत गरजेचे आहे. 


1.      
नियोजन (Planning)


      मैत्रिणींनो,

      माझ्या मते आपल्या घरच्या कामांमध्ये सर्वात महत्वाचेवेळ आणि कष्ट घेणारे काम कुठले असेल तर ते म्हणजे स्वयंपाक करण्याचे. तो मग  सणावाराच्या असो, 50 माणसांसाठी  असो  किंवा एका माणसासाठी. योग्य नियोजन केले तर ते काम  कठीण व कंटाळवाणे  वाटत नाही.  माझी आजी एक शिक्षिका होती ती नेहमी म्हणायची की स्वयंपाक हे एक शास्त्र आहे. त्याचे नियम पाळले तर ते काम किचकट न वाटता आनंददायी वाटते. शिवाय वेळ, कष्ट आणि गॅसची बचत करणेही शक्य होते.मला वाटते घरात सर्वात शिस्तीची  नियोजनाची गरज कुठे असेल तर ती स्वयंपाकघरात!

  • स्वयंपाक करताना किंवा त्याचे नियोजन करताना आपण नेहमी आनंदी आणि उत्साही असायला हवं  याचे  कारण असे आहे कि  आपला जसा मूड असेल तशीच चव आपल्या जेवणामध्ये येते.
  • फ्रीजची रचना करतांना कायम लागणाऱ्या वस्तू वरच्या कप्प्यात ठेवाव्या  म्हणजे सारखे वाकावे लागत नाही. हिरवी मिरची-कोथिंबीर-कढीलिंब एका  तीन कप्प्याच्या डब्यात ठेवली कि स्वयंपाकाला सुरुवात करताना एक डबा बाहेर काढला की सगळे हाताशी लागते. शिवाय सतत फ्रीज उघडावा लागत नाही,त्यामुळे विजेची बचत होते.
  • महिन्याच्या सुरुवातीला कॅलेंडरवर सणवार बघूनकिराणा सामानाची यादी बनवूनमहिन्याचे सामान घरी आणून ठेवले कि अचानक काही संपण्याचे टेन्शन येत नाही.
  • सुट्टीच्या दिवशी मार्केटला जाऊन आठवड्याभराच्या भाज्या व फळे  आणल्या आणि पालेभाज्या  स्वच्छ  धुवूननिवडूनसुकवूनअगदी कापुन सुद्धा कॉटनच्या  कपड्यांमध्ये  गुंडाळून घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवल्या की आठवडाभर फ्रेश राहतात.

 2.     Ingredients चेक करणे 


  •  उद्या आपल्याला टिफिनब्रेकफास्ट आणि डिनर साठी काय बनवायचे आहे याचे नियोजन  करणे खूप गरजेचे आहे. नियोजन व्यवस्थित केले असेल तर त्या नुसार आपण पुढची तयारी  चांगली करू शकतो. 
  • बरचशी तयारी आपण आदल्या दिवशी टीव्ही बघताना करू शकतो .
  • आपण जे नियोजन केले आहे त्या प्रमाणे आपल्याकडे साहित्य आहे की नाही आणि नसेल तर उपलब्ध  करून घेणे किंवा आहे त्यामध्येच आपण काय छान बनवू शकतो ह्याचा विचार करून त्याची तयारी करणे. 

उदा. आपल्याकडे जर  भाजीला फक्त थोडीशी  मेथीकांदाटोमॅटो एवढेच साहित्य असेल तर त्यामध्ये आपण उत्तम प्रकारे मेथीचा झुणका बनवू शकतो.

  • रात्री झोपताना दही लावणं कडधान्ये भिजत घालणे अशी कामे केली की आपण उठेपर्यंत दुसऱ्या दिवशीची तयारी झालेली असते. 

३.  Equipment चा योग्य वापर


  •       आपल्या किचन मध्ये बरेच equipment असतातत्याचा आपण योग्य रिती ने वापर करायलाच हवा.

       उदा. Vegetable Chopper, Food processor, microwave  etc.

  • Chopper मध्ये कटिंग फास्ट होते, Food processor मध्ये कणिक भिजवणे व मळणे अगदी 4-5 मिनिटात शक्य होते.
  • आपल्याकडे जर मायक्रोवेव असेल तर त्यामध्ये आदल्या दिवशी आपण भेंडी ग्रिल करून ठेवू शकतो आणि जर मायक्रोवेव्ह नसेल तर एखाद्या  कढाई मध्ये आपण ड्राय रोस्ट सुद्धा करून ठेवू शकतो जेणेकरून दुसऱ्या दिवशी भाजीला फक्त पाच ते सात मिनिटे लागतात. 
  • उपवासाची साबुदाणा खिचडी मायक्रोवेव्हमध्ये फक्त तीन ते चार मिनिटात तयार होते.

          4.  पूर्व तयारी व प्राधान्य


  • आदल्या दिवशी आपण बरीचशी तयारी करून ठेवू शकतो.  भेंडीलाल-भोपळादोडकी यासारख्या भाज्या कापणे, सँडविच ची तयारीअगदी पिझ्झा जरी बनवायचा असेल तरी त्याला लागणाऱ्या  भाज्या सुद्धा आपण कापून ठेवू शकतो,  त्यामुळे आपला अर्धा वेळ वाचतो.  मी नेहमी मुलाच्या टिफिन मध्ये रोज वेगवेगळे पदार्थ द्यायचीपिझ्झा-बर्गर सारख्या गोष्टी मी कधीच बाहेरून ऑर्डर करत नाहीआणि हे सगळं करून सकाळी सातच्या लेक्चरला अगदी वेळेवर कॉलेजला पोचायची.
  •  ब्रेकफास्ट/टिफिन साठी जर स्टफ पराठा बनवायचा असेल तर  stuffing साहित्य मिक्स न करता तयार करणे. 
  •  कमीत-कामी 8-10 दिवसांची आलं-लसूण ची पेस्ट करून ठेवणे. 
  • सकाळी Gravy  च्या भाज्या  जर आपल्याला बनवायच्या  असतील तर त्यासाठी विशिष्ट प्रकारच्या पेस्ट बनवून घेणे.
  • कोणता पदार्थ जास्ती वेळ लागणारा आहे किंवा कोणत्या पदार्थाची गरज आधी आहे आणि तोच आपल्याला बनवायला पाहिजे.

      उदा.  सकाळच्या स्वयंपाकामध्ये आपल्याला आधी भाजी फोडणी घालायला पाहिजे  जेणेकरून पोळ्या  होईपर्यंत आपली भाजी  तयार होईल आणि संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये आपल्याला कुकर  आधी लावायला हवा कारण भाजीकोशिंबीर आणि पोळ्या  होई पर्यंत कुकरची वाफ निघते.

5.    5.  स्वच्छता/platform cleaning

 

  स्वयंपाक झाल्या नंतरचे सर्वात महत्वाचे काम म्हणजे platform cleaning किंवा किचन साफ करणे.  कुठलेही cleaning चे काम ‘नंतर करू’ असा विचार करून pending न ठेवता जर त्याच वेळी केले तर नकीच आपल्याला कंटाळा येणार नाही.

स्वयंपाक करतानाच एकीकडे पसारा आवरत राहिले की नंतरची आवरा आवरी सोपी होते.

भांडी स्वच्छ करून ठेवणे , भाजी कापल्या नंतर चा कचरा या सारखी कामे जेव्हा ची तेंव्हा केली की आपल्याला त्रास होत  नाही. 
अगदी  दुसऱ्या दिवशी लागणारे टिफिन सुद्धा रात्रीच क्लीन करून एका साइड ला ठेवावे. 
 

घरी तुम्ही स्वतः स्वयंपाक करत असा किंवा बाई….... नियोजन करून केलेली गोष्ट सुबक आणि नेटकी हमखास होते.

 अजून अश्याच काही intresting  टिप्स  जाणून घेण्या साठी माझ्या ह्या 30 Minutes Magical Recipe    FB Page च्या लिंक वर क्लिक करा.


ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद!

हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेन्ट करा व तुमच्या ३ मैत्रिणींना  शेअर करा. 






 



Comments

  1. वा, सुंदर
    खूप छान

    ReplyDelete
  2. खूप सुंदर बनवला 😋👌👌

    ReplyDelete
  3. Very nice.. This is really helpful..

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. Each tip is clearly explained. Very useful and definitely will save time!

    ReplyDelete
  6. Great Pallavi....wonderful tips will surely implement it in my cooking

    ReplyDelete
  7. Wonderful tips Pallavi...thank you...looking forward to your next blog👍

    ReplyDelete
  8. खूप छान मॅडम, कॉलेज चे दिवस आठवले, तुमच्या टिफिन मध्ये रोज नवीन पदार्थ असायचे.

    ReplyDelete
  9. Very nicely written, nice tips ,I will definitely follow ,waiting for your next blog

    ReplyDelete
  10. खूप छान टिप्स पल्लवी👍
    स्वयंपाक आनंदाने केला तर पदार्थाची चव आणखी वाढते हे मात्र नक्की 💁
    स्तियांकरिता उपयोगाच्या टिप्स🌹🌹🌹👍

    ReplyDelete
  11. खूप छान पल्लवी. अगदी उपयुक्त माहिती दिलीस 👌👌👌👌

    ReplyDelete
  12. Grt... nice tips... very helpful for all working women and beginners.. your cooking has always motivated me... keep it up dear ����

    ReplyDelete
  13. Wow... खूप छान टिप्स दिल्यास पल्लवी अगदी उपयोगी असणाऱ्या....

    ReplyDelete
  14. Alot helpful for working women 👍

    ReplyDelete
  15. Khoop sundar prakare explain kela Pallavi 👌👌Waiting for your next blog......

    ReplyDelete
  16. Khup masta ma'am... Tumchya tips khup helpful aani time saving aahe .... Thank you ma'am ☺️☺️☺️

    ReplyDelete
  17. Khup masta ma'am... Tumche tips khup helpful aahet.. Thank you ma'am 😊

    ReplyDelete

Post a Comment